महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्मृतिदिन विशेष : कवयित्री बहिणाबाईंना अभिवादन; चौधरी वाड्यातील संग्रहालयात कार्यक्रम - कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मृतिदिन

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात बहिणाबाई स्मृती संग्रहालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ६९ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट
स्मृतिदिनी कवयित्री बहिणाबाईंना अभिवादन; चौधरी वाड्यातील संग्रहालयात कार्यक्रम

By

Published : Dec 3, 2020, 5:01 PM IST

जळगाव - बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात बहिणाबाई स्मृती संग्रहालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ६९ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

स्मृतिदिन विशेष : कवयित्री बहिणाबाईंना अभिवादन; चौधरी वाड्यातील संग्रहालयात कार्यक्रम

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त दिनानाथ चौधरी यांच्याहस्ते बहिणाबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी बहिणाबाई चौधरी यांच्या नातसून पद्मा चौधरी, पणती प्रियंका चौधरी, शोभा चौधरी, प्रिया चौधरी, वैशाली चौधरी, हितेंद्र चौधरी, मनस्वी चौधरी, राजेंद्र हरिमकर उपस्थित होते. बहिणाबाईंच्या परिवारातील सदस्य, चौधरी वाड्यातील सदस्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन प्रसारीत झालेल्या 'अरे संसार संसार’ कार्यक्रम बघण्यात आला.

महाराष्ट्रभर गाजत असलेल्या बहिणाबाईंची गीते आणि कवितांची सुरेल मैफल, 'अरे संसार संसार'च्या माध्यमातून चौधरीवाड्यातील सदस्यांनी अनुभवली. कार्यक्रमाप्रसंगी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करण्यात आले. यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, रंजना चौधरी यांनी सहकार्य केले. दिवसभर स्मृती संग्रहालयाला साहित्यप्रेमींनी भेटी दिल्या.

बहिणाबाईंच्या स्मृतींना मिळाला उजाळा

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून भवरलाल अॅन्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रुपांतर संग्रहालयात झालेले आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या रोजच्या वापरातील शेतीची अवजारं, स्वयंपाकाच्या वस्तू, भांडी, पुजेचं साहित्य यांची जपवणूक केली आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येत आहे. 'अरे संसार संसार' म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात. स्मृतिदिनानिमित्त बहिणाबाईंच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details