महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रात्रीच्या संचारबंदीला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्या दिवशी रस्त्यांवर शुकशुकाट

कोरानाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पहिला दिवस असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना संचारबंदीला प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात येत होते.

पहिल्या दिवशी रस्त्यांवर शुकशुकाट
पहिल्या दिवशी रस्त्यांवर शुकशुकाट

By

Published : Feb 23, 2021, 6:53 AM IST

जळगाव - कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार असून, यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना बाहेर पडण्यासाठी निर्बंध घालण्यात आहेत. संचारबंदीच्या पहिल्या दिवशी अपवाद वगळता सर्वच ठिकाणी नागरिकांनी रात्रीच्या संचारबंदीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे चित्र 'ईटीव्ही भारत'च्या पाहणीत दिसले.

पहिल्या दिवशी रस्त्यांवर शुकशुकाट
पुढील काळात थेट कारवाई होणारगेल्या आठवडाभरापासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरानाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पहिला दिवस असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना संचारबंदीला प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र, या पुढच्या काळात नियम मोडणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, टॉवर चौक, जुने जळगाव, अशा मध्यवर्ती तसेच गर्दीच्या ठिकाणी रात्रीच्या संचारबंदीला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.चौकाचौकात पोलीस बंदोबस्तरात्रीची संचारबंदी घोषित केल्याने शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संचारबंदीविषयी ज्या नागरिकांना माहिती नाही, त्या नागरिकांना पोलीस माहिती देत होते. तसेच वाहनांचीही कसून तपासणी करण्यात येत होती. संचारबंदीत बाहेर फिरू नये, याविषयी पोलीस आवाहन करत होते.कामगारांना ओळखपत्राची सक्तीरात्रीच्या संचारबंदीविषयी माहिती देताना 'ईटीव्ही भारत'शी बोलताना शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय येरुळे म्हणाले की, या संचारबंदीच्या काळात रात्रपाळीवरून कामावरून घरी येणारे तसेच कामावर जाणाऱ्या कामगारांना आपल्या आस्थापनाने दिलेल्या ओळखपत्राची सक्ती केली आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी बाहेरून शहरात दाखल होणाऱ्या प्रवाशांना निर्बंधांमधून वगळले आहे. अशा प्रवाशांना रात्रीच्या प्रवासासाठी रिक्षा उपलब्ध होणार आहे. परंतु, एका रिक्षात दोनपेक्षा अधिक प्रवासी नसतील. शिवाय प्रत्येकाला मास्कची सक्ती असेल. दरम्यान, रात्रीच्या संचारबंदीत अत्यावश्यक सेवा तसेच मेडिकल इमर्जन्सी वगळता कुणीही बाहेर फिरू नये, असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details