महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव सराफ बाजारात उलाढाल मंदावली; जाणून घ्या, सोने-चांदीचे दर - gold price in Jalgaon

सध्या लग्नसराई नाही. पावसाळा असल्याने जळगावमधील सराफ बाजारात उलाढाल मंदावली आहे

gold rate news
gold rate news

By

Published : Sep 3, 2021, 1:57 PM IST

जळगाव -सुवर्णनगरी म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोने व चांदी खरेदी-विक्रीची उलाढाल काहीशी मंदावली आहे. चालू आठवड्याच्या शेवटी चांदीचे दर 500 रुपयांनी घसरले आहेत. तर सोन्याचे दर मात्र, स्थिर आहेत.

संपूर्ण आठवडाभर जळगावात सोने व चांदीचे दर 200 ते 300 रुपयांनी कमी-जास्त राहिले. दोन्ही धातूंच्या दरांमध्ये फार मोठी उलथापालथ पाहायला मिळाली नाही.

हेही वाचा-दिल्लीच्या विधानसभेच्या खाली एक गुप्त बोगदा; लवकरच पर्यटकांसाठी होणार खुला

चांदीत नोंदवली गेली घसरण-

जळगाव शहरातील सराफ बाजारात शुक्रवारी सकाळी व्यवहार सुरू झाले. तेव्हा 3 टक्के जीएसटीसह सोन्याचे दर 48 हजार 800 रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर 64 हजार 750 असे नोंदवले गेले. शुक्रवारी सराफ बाजारातील व्यवहार सुरळीतपणे सुरू झाल्यावर चांदीच्या दरामध्ये आधीच्या तुलनेत 500 रुपयांची घसरण नोंदवली गेली.

हेही वाचा-भारत-पाक सीमेवरील घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न जवानांनी उधळला



दरांबाबत काय म्हणतात सराफ व्यावसायिक?

सोने व चांदीच्या दरांमध्ये होणारे चढउतार यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गौतमचंद लुणिया म्हणाले की, चालू आठवड्यात जळगावच्या सराफ बाजारात सोने व चांदी दोन्ही धातूंच्या दरांमध्ये फारसा लक्षणीय चढउतार पाहायला मिळाला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक व्यवहार स्थिर असल्याने सोने व चांदीचे दर 200 ते 300 रुपयांनी कमी-जास्त राहिले. सध्या लग्नसराई नाही. पावसाळा असल्याने सराफ बाजारात उलाढाल मंदावली आहे. सोने व चांदीचे दर जवळपास स्थिर असल्याने गुंतवणूकदारांनी देखील खरेदी-विक्री करण्यात हात आखडता घेतल्याचे चित्र असल्याचेलुणिया यांनी सांगितले.

हेही वाचा-ऑनलाईन गेमचे वेड; 17 वर्षीय मुलाने रागाच्या भरात केला वडिलांचा खून

65 हजारांच्या घरात होते चांदीचे दर-

चालू आठवड्यात म्हणजेच 30 ऑगस्टला चांदीचे दर प्रति किलोसाठी 65 हजार ते 65 हजार 100 असे होते. तर सोन्याचे द देखील प्रति तोळ्याला 48 हजार 600 ते 48 हजार 800 असे राहिले होते. या दरांमध्ये आठवडाभर 200 ते 300 रुपयांनी चढउतार राहिला. आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी चांदीचे दर 500 रुपयांनी कमी झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details