महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात 12 तासात सोन्याचे दर 254 रुपयांनी घटले; जाणून घ्या, बुधवारचे दर...

सोन्याच्या व्यापारासाठी जळगावची देशभर ओळख आहे. सचोटी आणि गुणवत्ता या दोन कारणांमुळे जळगाव सराफ बाजाराचा देशभर लौकिक आहे.

jalgaon gold rate
जळगाव सोने दर

By

Published : Jun 16, 2021, 8:29 AM IST

जळगाव -सुवर्णनगरी असलेल्या जळगावात गेल्या 12 तासात सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 254 रुपयांनी घटले आहेत. मंगळवारी दिवसभर सोन्याचे दर प्रतितोळा 48 हजार 598 रुपये होते. बुधवारी सुवर्ण बाजाराला सुरुवात झाल्यानंतर सकाळी सोन्याचे दर 254 रुपयांनी घटून 48 हजार 344 रुपये इतके नोंदवले गेले.

सोन्याच्या व्यापारासाठी जळगावची देशभर ओळख आहे. सचोटी आणि गुणवत्ता या दोन कारणांमुळे जळगाव सराफ बाजाराचा देशभर लौकिक आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत दररोज सकाळी व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांच्या नजरा सोने व चांदीच्या दरांकडे असतात. सकाळी समोर येणारे दर पाहून व्यवहार ठरत असतात.

हेही वाचा -जळगाव जिल्हा उद्योग केंद्रातील प्रकल्प अधिकारी 10 हजारांची लाच घेताना जाळ्यात

मंगळवारी 253 रुपयांची वाढ तर बुध 254 रुपयांची घट -

मंगळवारी (15 जून) जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात प्रतितोळा 253 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती. तर सोमवारी (14 जून) सोन्याचे दर 48 हजार 345 इतके होते. मंगळवारी (15 जून) त्यात 253 रुपयांनी वाढ झाल्याने दर 48 हजार 598 झाले होते. तर आज (बुधवारी) सोन्याचे दर 254 रुपयांनी खाली आले आहेत. आजचे ताजे दर 48 हजार 344 रुपये प्रतितोळा आहेत.

असे आहेत आजचे सोने-चांदीचे दर -

सोने- 48 हजार 344 (3 टक्के जीएसटी वगळून) प्रति 10 ग्रॅम
चांदी- 71 हजार 500 प्रतिकिलो

ABOUT THE AUTHOR

...view details