महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीतील भामट्यास अटक, चोरीचे सोने घेणाराही पोलिसांच्या जाळ्यात

खान्देशातील विविध जिल्ह्यांमध्ये सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीतील एका भामट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याचे इतर दोन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीकडून चोरीचे सोने विकत घेणाराही पोलिसांच्या जाळ्यात आला आहे.

Gold chain thief arrested in Jalgaon
जळगावात सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीतील भामट्यास अटक; चोरीचे सोने घेणाराही पोलिसांच्या जाळ्यात

By

Published : May 5, 2021, 8:30 AM IST

जळगाव - खान्देशातील विविध जिल्ह्यांमध्ये सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीतील एका भामट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याचे इतर दोन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीकडून चोरीचे सोने विकत घेणाराही पोलिसांच्या जाळ्यात आला आहे.

तौफिक हुसेन जाफर हुसेन (वय 18, रा. भुसावळ) आणि हरिचंद्र दत्तात्रय इखनकर (वय 25, रा. सराफ गल्ली, भुसावळ) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यातील तौफिक हा सोनसाखळी चोरटा असून, हरिचंद्र हा चोरीचे सोने घेणारा आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईत सोनसाखळी चोरीचे 14 गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाई बाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले उपस्थित होते.

जळगावात सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीतील भामट्यासह चोरीचे सोने घेणाराही पोलिसांच्या जाळ्यात

खान्देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यात करत होते गुन्हे -

संशयित आरोपी तौफिक याच्यासह त्याचे दोन साथीदार सोहेल अली युसूफ अली आणि अरबाज अली युसूफ अली (दोघे रा. इराणी मोहल्ला, भुसावळ) हे खान्देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सोनसाखळी चोरीचे गुन्हे करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार पोलीस त्यांच्या मागावर होते. अशातच आरोपी हे भुसावळात आल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचला होता. त्यात तौफिक जाळ्यात आला. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील दोन तसेच भुसावळ शहर व चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने इतर दोन्ही साथीदारांसह भुसावळ व चाळीसगाव या व्यतिरिक्त मालेगाव कॅम्प, लासलगाव, शिरपूर, नंदुरबार, निफाड आणि सिन्नर याठिकाणी सोनसाखळी चोरीचे 14 गुन्हे केलेले आहेत, ही बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. पोलीस पथके फरार असलेल्या दोघांच्या शोधार्थ रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडेंनी यावेळी दिली.

चोरी केल्यानंतर नातेवाईकांकडे राहत होते लपून -

तिन्ही आरोपींचे नातेवाईक हे मालेगाव, भुसावळ तसेच परळी वैजनाथ येथे राहतात. विविध शहरांमध्ये सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्यानंतर आरोपी आपल्या नातेवाईकांकडे लपून राहत होते. चोरी केल्यानंतर ते काही दिवस भूमिगत व्हायचे, त्यामुळे पोलिसांना त्यांना पकडणे शक्य होत नव्हते. मात्र, अखेर त्यांच्यापैकी एक भामटा पोलिसांच्या जाळ्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details