जळगाव -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत असताना सर्वच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यातच सणासुदीच्या काळात मागणी वाढत असल्याने सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ सुरू झाली आहे. शुक्रवारी (दि. ६) जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार रुपयांनी तर चार दिवसात तब्बल तीन हजार रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदीचे भाव पुन्हा ६५ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे सोन्याच्या भावातही गेल्या चार दिवसात ९५० रुपयांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले लॉकडाऊन अनलॉक होत असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील आयात-निर्यात पूर्वपदावर येत आहे. यामध्ये सर्वच देशांकडून सोने-चांदीला मागणी वाढत असल्याने व त्यात सोने खरेदीत मोठा हिस्सा असलेल्या भारतातही सणासुदीच्या काळात या धातूंना मागणी वाढत आहे. नवरात्रोत्सव व दसऱ्यानंतर मागणी कमी झाल्याने सोने-चांदीचे भाव काहीसे कमी झाले होते. मात्र, आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बाजारपेठेत लगबग वाढल्याने सोने-चांदीचे भाव वाढू लागले आहे.
चांदीच्या दरात आठवडाभरात साडेचार हजार रुपयांनी वाढ -