महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गिरणा धरण १०० टक्के भरले ; जळगावचा पाणीप्रश्न निकाली - जळगावचा पाणीप्रश्न निकाली

गिरणा नदीवर असलेले गिरणा धरण हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणामुळे नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील हजारो गावांची पाण्याची तहान भागवली जाते. याशिवाय तिन्ही जिल्ह्यातील तब्बल दीड लाख एकर शेतीक्षेत्र भिजवण्याची क्षमता देखील या धरणात आहे. त्यामुळे शेती सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने गिरणा धरण अतिशय उपयुक्त ठरते.

गिरणा धरण

By

Published : Sep 17, 2019, 5:27 PM IST

जळगाव- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात गिरणा नदीवर असलेले गिरणा धरण १०० टक्के भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तब्बल १२ वर्षांनंतर गिरणा धरण पूर्ण भरले असून नाशिकसह जळगाव जिल्ह्यातील ५ तालुक्यांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे.

गिरणा धरण १०० टक्के भरले

हेही वाचा-जळगाव जिल्ह्यात पिकांना अतिवृष्टीचा फटका; शेतकरी हतबल

गिरणा नदीवर असलेले गिरणा धरण हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणामुळे नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील हजारो गावांची पाण्याची तहान भागवली जाते. याशिवाय तीनही जिल्ह्यातील तब्बल दीड लाख एकर शेतीक्षेत्र भिजवण्याची क्षमता देखील या धरणात आहे. त्यामुळे शेती सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने गिरणा धरण अतिशय उपयुक्त ठरते. यावर्षी दमदार पावसामुळे धरण सप्टेंबर महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू आहे. धरण देखील पूर्ण भरल्यामुळे त्यातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत गिरणा धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन रब्बी हंगामातील शेती सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सोडले जाते. यावर्षी धरण पूर्ण भरल्यामुळे धरणातून सिंचनासाठी नियमित आवर्तन मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गिरणा धरणातून पांझण, जामदा डावा, जामदा उजवा तसेच निम्न गिरणा हे कालवे काढण्यात आले आहेत. हे कालवे देखील आता खळखळून वाहणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details