जळगाव -तालुक्यातील भादली गावात राहणाऱ्या एका तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि. 7 जाने.) दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. खुशबू गोपाळ चौधरी (वय 23 वर्षे), असे मृत तरुणीचे आहे.
गुरुवारी भादली गावातच एका लग्नसमारंभात खुशबूची आई गेली होती. एकट्या असलेल्या खुशबुने गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खुशबुला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. खासगी मोटारीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कुरकुरे यांनी तपासणी करुन तिला मृत घोषित केले.
एकुलती एक होती मुलगी