जळगाव -शहरातील खोटेनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही मुलगी आपल्या आजीसोबत रहात होती. आत्महत्येपूर्वी या मुलीने एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये मी स्वत:हून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येबाबत कोणालाही जबाबदार धरू नये असे तिने म्हटले आहे. दरम्यान या मुलीवर दोन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप होता.
आत्महत्या केलेली मुलगी सहा महिन्यांपासून खोटेनगरात आजीकडे राहत होती. दरम्यान, २७ ऑक्टोबर रोजी ती घरातील वरच्या मजल्यावर एका खोलीत झोपली होती. सायंकाळी सात वाजेपर्यंत ती खाली न आल्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता आतून दरवाजा बंद होता. आवाज देऊनही ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. यावेळी अल्पवयीन मुलगी ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.