जळगाव- जिल्ह्यातील अमळनेर शहरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी अमळनेरला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, आढावा बैठकीनंतर महाजन यांनी डॉक्टरांसाठी 185 पीपीई किट आणि 200 लिटर सॅनिटायझर उपलब्ध करून दिले. त्यामुळे डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे.
गिरीश महाजनांनी घेतला अमळनेरातील परिस्थितीचा आढावा, 185 पीपीई किटचे वाटप - गिरीश महाजनांनी घेतला अमळनेरातील परिस्थितीचा आढावा
आरोग्य यंत्रणेला भासणाऱ्या कमतरतेविषयीही महाजन यांनी विचारले. यावेळी डॉक्टरांनी जास्त लोक असल्यामुळे पीपीई किट, दवाखाने किंवा कोविड सेंटर स्वच्छ करण्यासाठी सॅनियझरची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानुसार, गिरीश महाजन यांनी 185 पीपीई किट आणि 200 लिटर सॅनिटायझर दिले.
या बैठकीस आमदार स्मिता वाघ, प्रांत सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, डॉ. अनिल शिंदे, डॉ. संदीप जोशी, डॉ. नितीन पाटील यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. गिरीश महाजन यांनी रुग्ण का वाढत आहेत? याची विचारपूस केली. त्यावेळी प्रशासन आणि डॉक्टरांनी सांगितले की, अमळनेर शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांचे स्वॅब घेतले जात असून लक्षणे नसली तरी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. तपासणी संख्या जास्त असल्यानेच रुग्णदेखील जास्त दिसत आहेत. परंतु, ते विशिष्ट झोनमधीलच आहेत आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आरोग्य यंत्रणेला भासणाऱ्या कमतरतेविषयीही महाजन यांनी विचारले. यावेळी डॉक्टरांनी जास्त लोक असल्यामुळे पीपीई किट, दवाखाने किंवा कोविड सेंटर स्वच्छ करण्यासाठी सॅनियझरची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानुसार, गिरीश महाजन यांनी 185 पीपीई किट आणि 200 लिटर सॅनिटायझर दिले. तसेच येत्या दोन दिवसात जिल्ह्यासाठी 5000 पीपीई किट मागवले असून आणखी किट अमळनेरसाठी देईल, असे त्यांनी सांगितले. मुंबईच्या तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असेल तर त्यांनादेखील बोलावून घेण्याची तयारी महाजन यांनी दर्शवली होती. मात्र, स्थानिक डॉक्टरांनी सध्या त्याची गरज नसल्याचे सांगितले.