महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घडलेली घटना दुर्दैवीच, तिचे समर्थन करणार नाही; अमळनेरातील हाणामारीवर महाजनांची प्रतिक्रिया

या घटनेचे मी समर्थन करणार नाही. या घटनेमुळे मलाही वेदना झाल्या आहेत.

By

Published : Apr 10, 2019, 11:56 PM IST

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन

जळगाव - अमळनेरात महायुतीच्या मेळाव्यात भाजपचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील आणि जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यात झालेली हाणामारीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेचे मी समर्थन करणार नाही. या घटनेमुळे मलाही वेदना झाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

अमळनेरात घडलेल्या घटनेनंतर जळगावात आले असता गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, अमळनेरात भाजप, शिवसेना, रिपाइं तसेच रासप या मित्रपक्षांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी असा मारहाणीचा प्रकार घडायला नको होता. निश्चितच उदय वाघ यांचे चुकले आहे. त्यांuday waghचे वैयक्तिक मतभेद होते तर त्यांनी ते परस्पर किंवा प्रत्यक्ष भेटून मिटवायला हवे होते. मात्र, त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर असा प्रकार करायला नको होता. ही बाब पक्षाच्या शिस्तीला अनुसरून नाही. पक्षाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. या विषयासंदर्भात पक्षश्रेष्ठी कारवाई करतील, असे स्पष्टीकरण महाजन यांनी दिले.

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन

...म्हणून मलाही बळाचा वापर करावा लागला
व्यासपीठावर जो प्रकार घडला तो गंभीर होता. २० ते २५ कार्यकर्ते माजी आमदार पाटील यांना मारहाण करत होते. त्यामुळे आम्ही त्यांना वाचवण्यासाठी पुढे गेलो. कार्यकर्ते आक्रमक होते. त्यांना रोखणे गरजेचे होते. अन्यथा अजून मोठा अनर्थ घडला असता. अनर्थ घडू नये म्हणून मलाही बळाचा वापर करावा लागला, असेही महाजन म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details