जळगाव -धावत्या गाडीचे टायर फुटल्यामुळे भरलेला एलपीजी गॅस टँकर कलंडला. सुदैवाने टँकरला गळती न लागल्यामुळे मोठा अनर्थ टळाला. रविवारी जळगाव तालुक्यातील खेडी गावाजवळ महामार्गावर हा अपघात घडला.
टायर फुटल्यामुळे गॅस टँकर कलंडला; सुदैवाने अनर्थ टळाला
मुंबईहून हा टँकर (एमएच ४३ वाय ९८०१) नागपुरकडे जाण्यासाठी निघाला होता. चालक मुनीवर हा एकटाच टँकर घेऊन जात होता. रविवारी खेडी गावाजवळ अचानक या टँकरचे पुढचे चाक फुटले. यामुळे संपूर्ण टँकरचा बॅलेन्स बिघडल्याने एलपीजी गॅसने भरलेले रिफील रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडले.
मुंबईहून हा टँकर (एमएच ४३ वाय ९८०१) नागपुरकडे जाण्यासाठी निघाला होता. चालक मुनीवर हा एकटाच टँकर घेऊन जात होता. रविवारी खेडी गावाजवळ अचानक या टँकरचे पुढचे चाक फुटले. यामुळे संपूर्ण टँकरचा बॅलेन्स बिघडल्याने एलपीजी गॅसने भरलेले रिफील रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडले. सुदैवाने या रिफीलला गळती लागली नाही. रस्त्यावर नागरिकांची वर्दळही नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर चालक मुनीवर हा पळून गेला होता. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, योगेश बारी, भूषण सोनार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
टँकरचे रिफील गॅसने भरलेले असल्यामुळे गळतीची तपासणी करण्यासाठी भारत गॅस येथून मनोज वर्मा यांना बोलावण्यात आले होते. त्यांनी तपासणी करुन रिफीलला गळती नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर क्रेनच्या साह्याने रिफील उचलण्यात आले. एमआयडीसी पोलिसांनी दुपारी चालक मुनवर यालाही ताब्यात घेतले होते.