जळगाव -पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ( Rape on 14 year old girl ) पाच ते सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी तीनही नराधमाना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. तर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ( Pimpalgaon Hareshwar Police ) स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rape On Minor Girl Jalgaon : वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; तीन आरोपींना अटक - पाचोरा मुलीवर बलात्कार बातमी
१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ( Rape on 14-year-old girl ) पाच ते सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी तीनही नराधमाना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. तर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ( Pimpalgaon Hareshwar Police ) स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![Rape On Minor Girl Jalgaon : वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; तीन आरोपींना अटक पिंपळगाव पोलीस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15293180-570-15293180-1652616395758.jpg)
पाचोरा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ती गल्लीतील मैत्रीणीसोबत बोलत होती. त्यानंतर मात्र अल्पवयीन मुलगी गायब झाली. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी आली नाही, म्हणून तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केला. गावातील २० ते २५ जणांनी दुचाकी काढून गावातील आजूबाजूच्या शेतात शोधमोहिम राबविली. गावातील वातावरण शांत झाल्यानंतर अज्ञात ५ ते ६ जणांनी १४ वर्षीय मुलीला उचलून नेत तिच्यावर सामूहिकरित्या अत्याचार केला आणि पिडीत मुलीला पहाटे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्यानंतर गावातील महिलांच्या शौचालया जवळ सोडून दिले. अल्पवयीन मुलगी घरी आल्यावर हा सगळा प्रकार उघडकी आला. यानंतर गावात परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिडीत मुलीला पाचोरा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेबाबत पिंपळगाव पोलिसांत पोक्सो कायद्या सह तिन बलात्कारी नराधमावर सामूहिक बलात्काराचा गुन्ह्याही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयित आरोपी हे गावातीलच असल्याची दाट शक्यता असून त्यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहे.