जळगाव - बुद्धीची देवता असलेल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातही विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पूर्वापार चालत आलेली गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे. अनेक मंडळांनी अतिशय विलोभनीय गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. उत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासूनच गणेशभक्तांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे.
गणेशोत्सव 2019 : जळगावात विविध मंडळांच्या विलोभनीय गणेशमूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू हेही वाचा -ठाण्यात 'वाचाल तर वाचाल' असा संदेश देणारे बाप्पाची स्थापना
विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विलोभनीय गणेशमूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. गणेशोत्सव आणि देखावे यांचे अजोड असे नाते आहे. अनेक मंडळांनी सामाजिक, पारंपरिक तसेच ऐतिहासिक विषयांवर देखावे उभारले आहेत. हे देखावे गणेशभक्तांसाठी तिसऱ्या दिवशी खुले करण्यात आले. रात्रीच्या वेळी गणेश दर्शन तसेच देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.
हेही वाचा - ओझरच्या विघ्नेश्वर गणपतीच्या जन्मोत्सवानिमित्त कुस्तीची दंगल
शहरातील अनेक मंडळांना अर्धशतकापेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणेच महापालिका, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यासारख्या शासकीय, निमशासकीय संस्थांनी देखील गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे.