महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात ढोल-ताशांच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात - Jalgaon in Dhol-Tasha's Music

शहरातील कोर्ट चौकापासून सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. सर्वात आधी मानाचा असलेला महापालिकेच्या गणपतीचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्याहस्ते विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक सुरू झाली. या मिरवणुकीत शहरातील सर्वच मानाच्या गणेश मंडळांसह इतर लहान व मोठे मंडळे सहभागी झाले आहेत. ही मिरवणूक कोर्ट चौकापासून पुढे नेहरू पुतळा चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, भिलपुरा मशीद चौक, जुने जळगाव, इच्छादेवी चौफुलीमार्गे मेहरूण तलावावर जाते.

गणेश विसर्जन - जळगाव

By

Published : Sep 12, 2019, 3:03 PM IST

Updated : Sep 13, 2019, 9:23 AM IST

जळगाव - लाडक्या गणरायाची १० दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या मुहुर्तावर त्याला भावपूर्ण निरोप देण्यासाठी अवघी जळगावनगरी सज्ज झाली आहे. ढोल-ताशांचा गजर, फुलांची मुक्त उधळण तसेच 'गणपती बाप्पा मोरया..., पुढच्या वर्षी लवकर या...' अशा जयघोषात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

जळगावात ढोल-ताशांच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

हेही वाचा - लालबागचा राजाच्या दर्शनाला पोहोचलेल्या स्वरा भास्करवर गुदरला 'हा' प्रसंग

शहरातील कोर्ट चौकापासून सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. सर्वात आधी मानाचा असलेला महापालिकेच्या गणपतीचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्याहस्ते विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक सुरू झाली. या मिरवणुकीत शहरातील सर्वच मानाच्या गणेश मंडळांसह इतर लहान व मोठे मंडळे सहभागी झाले आहेत. ही मिरवणूक कोर्ट चौकापासून पुढे नेहरू पुतळा चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, भिलपुरा मशीद चौक, जुने जळगाव, इच्छादेवी चौफुलीमार्गे मेहरूण तलावावर जाते.

हेही वाचा -मुंबईत गणेश विसर्जनाची तयारी जय्यत, बंदोबस्तासाठी ४० हजाराहून अधिक पोलीस तैनात

त्याठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. गुलाल आणि डॉल्बी विरहीत मिरवणूक हे जळगावच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य मानले जाते. गुलालऐवजी झेंडू, गुलाबाच्या फुलांची मुक्त उधळण केली जाते. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही मिरवणूक साधारणपणे १५ ते १६ तास चालते. रात्री उशिरा मानाच्या गणपतींचे विसर्जन केले जाते.

हेही वाचा - पुण्याच्या पाचही मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावर्षी प्रथमच गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी अतिशीघ्र कृती दलाच्या जवानांच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. याशिवाय महापालिका, महावितरण कंपनीच्या वतीने देखील आपत्ती व्यवस्थापनासाठी कर्मचाऱ्यांची खास पथके तैनात करण्यात आली आहेत.

हेही वाचा - मुंबईत बाप्पाच्या दर्शनासाठी कलाकारांची मांदियाळी

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर रांगोळीच्या आकर्षक पायघड्या टाकण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ', 'स्त्री भ्रूणहत्या रोखा', 'पर्यावरण वाचवा', 'जलसंधारण' अशा सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या देखील विविध सामाजिक संस्था व संघटनांनी काढल्या आहेत. गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी खास व्यवस्था करण्यात आली आहे. विविध गणेश मंडळांचे स्वयंसेवक पोलिसांना सहकार्य करण्यासाठी मिरवणुकीत सहभागी आहेत.

Last Updated : Sep 13, 2019, 9:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details