महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shiv Sena Gaddar Thali : पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या 40 गद्दार आमदारांच्या नावे 40 रूपयांची गद्दार थाळी - Gaddar Thali on the name of 40 rebel MLAs

राज्यामध्ये आतापर्यंत बुलेट थाळी, बाहुबली थाळी अशा अनेक थाळ्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यात आता शिवसेनेची गद्दार थाळी आली Shiv Sena Gaddar Thali आहे. राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे शिवसेनेच्यावतीने '40गद्दार', '50 खोके एकदम ओके या दोन थाळ्या सध्या पंढरपूर तालुक्यात सर्वत्र चर्चेत येऊ लागल्या 40 rebel MLAs of Shiv Sena आहेत.

Traitor plate
गद्दार थाळी

By

Published : Sep 15, 2022, 1:03 PM IST

पंढरपूर -राज्यामध्ये आतापर्यंत बुलेट थाळी, बाहुबली थाळी अशा अनेक थाळ्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यात आता शिवसेनेची गद्दार थाळी आली Shiv Sena Gaddar Thali आहे. राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे शिवसेनेच्यावतीने '40गद्दार', '50 खोके एकदम ओके या दोन थाळ्या सध्या पंढरपूर तालुक्यात सर्वत्र चर्चेत येऊ लागल्या 40 rebel MLAs of Shiv Sena आहेत.

40 गद्दार आमदारांच्या नावे गद्दार थाळी

40 आमदारांच्या नावे -राज्यात सत्तांतर झाले. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली 40 आमदार गुवाहाटी येथे गेले आणि अनेक घडामोडीनंतर राज्यात शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आले. यानंतर शिवसेनेकडून शिंदे गटाच्या आमदारांना सातत्याने गद्दार म्हणून हिणवले गेले. याच 40 आमदारांच्या नावाने '40 गद्दार' ही शाकाहारी थाळी तयार Gaddar Thali on the name of 40 rebel MLAs झाली. तर मांसाहारी ग्राहकांसाठी 50खोके एकदम ओके अशी थाळी करण्यात आली आहे.

50 खोके एकदम ओके - विधानसभेच्या आवारात '50 खोके एकदम ओके' नावाने झालेल्या घोषणावरुन अनोखी मांसाहारी थाळी तयार करण्यात आली आहे. सांगोला रस्त्यावर असलेल्या दत्तात्रय यादव आणि बंडू घोडके यांच्या हॉटेल शिवम या ठिकाणी ही थाळी सध्या उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे ह्या थाळीची किंमत 40 रुपये आणि 50 रुपये अशी ठेवण्यात आली आहे. पंढरपूर तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय घोडके यांच्या संकल्पनेतून ही थाळी निर्माण करण्यात आली आहे. सध्या महागाई च्या जमान्यात 40 रुपयांमध्ये पोटभर नाष्टा होत नाही परंतु 40रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळत असल्याने 40 गद्दार थाळी लोकप्रिय झाली Gaddar Thali of 40 rupees आहे.या थाळी ची सद्या पंढरपूर तालुक्यात जोरदार चर्चा Gaddar Thali Pandharpur रंगली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details