जळगाव -देशसेवेसाठी जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे तैनात असताना अपघाती मृत्यू झालेले जिल्ह्याचे सुपूत्र व सीमा सुरक्षा दलाचे जवान अमित पाटील यांच्यावर आज (शुक्रवारी) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्यावर मूळगावी वाकडी येथे दुपारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
हुतात्मा जवान अमित पाटील यांच्या पार्थिवावर आज मूळगावी होणार अंत्यसंस्कार - अमित पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार
जम्मू काश्मीरमध्ये अपघाती मृत्यू झालेले जिल्ह्याचे वीरजवान अमित पाटील यांच्या पार्थिवावर आज अत्यंसस्कार होणार आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील जवान अमित साहेबराव पाटील (वय 32) हे बीएसएफमध्ये जम्मू-काश्मीर येथे कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना त्यांच्या अंगावर बर्फ कोसळून त्यांचा अपघात झाला होता. परंतु, त्यांचा उपचारादरम्यान 16 डिसेंबरला सकाळी मृत्यू झाला होता. आज त्यांचे पार्थिव सकाळी इंदूर येथून वाहनाने मूळगावी वाकडी येथे अंत्यसंस्कारासाठी आणले जाणार आहे. त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गावात शोकाकूल वातावरण-
अमित पाटील यांच्या निधनामुळे वाकडी गावात शोकाकूल वातावरण असून, त्यांच्या वीरमरणाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गावात त्यांच्या पार्थिवाला अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आले आहेत, तसेच पाटील यांचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. तसेच गावातील प्रत्येक घरासमोर, चौकात रांगोळ्या काढण्यात आल्या, असून त्यावर 'शहीद अमित पाटील अमर रहे' असे लिहिण्यात आलेले आहे.