जळगाव -एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू ( ST Strike ) असल्याने बससेवा बंद आहे. परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागताे आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन भडगाव येथील बापूजी युवा फाउंडेशनतर्फे ( Bapuji Yuva Foundation ) तालुक्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पाेहाेचवण्यासाठी मोफत सेवा सुरू ( Free Bus Service For Students ) केली आहे. तीन बसेसमधून दोन फेऱ्यांमध्ये ३०० परीक्षार्थी या माेफत सेवेचा सध्या लाभ घेताहेत.
विद्यार्थ्यांना मदत -
बारावीच्या परीक्षेला ४ मार्चपासून सुरुवात झाली आहे. एसटी बसेसच्या संपामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहाेचताना अडचणींचा सामना करावा लागणार होता. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेता फाउंडेशनतर्फे खासगी तीन बसेस भाड्याने घेण्यात आल्या असून, तीन गटात या बसेस चालवण्यात येत आहेत. ही सेवा कजगाव-वाडे गट, वडजी-गुढे गट तर तिसरा आमडदे-गिरड गट आहे. या तिन्ही गटांत रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक गावात सकाळी ८ ते दहा वाजेदरम्यान बस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी येत आहे. प्रत्येक गावात बस येण्याचा विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आल्याने ते परीक्षेच्या आधीच केंद्रावर पोहाेचत आहे.
हेही वाचा -आरोप प्रत्यारोप बंद करा, सर्वांनी मिळून विकासाला महत्व दिलं पाहिजे; उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रत्येक गटासाठी एका व्यक्तीचा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. यामुळे बस गावाच्या स्टॉप वर येण्याआधीच बापूजी युवा फाउंडेशन चे सदस्य विद्यार्थ्यांशी संपर्क साधून वेळेचे नियोजन करत आहेत. बापूजी युवा फाउंडेशनच्या या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना होणारी अडचण भासत नसून प्रवासाचा ताण मिटल्याने चांगल्या पद्धतीने आपली परीक्षा देता येत असल्याचे मत देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. या अनोख्या उपक्रमामुळे तालुक्यातून या फाऊंडेशनचे कौतुक होत आहे.