महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑनलाइन साडी पडली महागात, महिलेला ५ हजारांचा गंडा - Online shopping fraud Jalgaon

ऑनलाइन खरेदी केलेली साडी पसंत न पडल्यामुळे, पैसे परत करण्यासाठी केलेल्या संपर्कातून महिलेला पाच हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोेर आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Fraud of a woman for Rs 5,000 in
महिलेला 5 हजारांचा गंडा

By

Published : Nov 15, 2020, 4:01 PM IST

Updated : Nov 15, 2020, 7:10 PM IST

जळगाव -ऑनलाइन खरेदी केलेली साडी पसंत न पडल्यामुळे, पैसे परत करण्यासाठी केलेल्या संपर्कातून आरोपीने महिलेला 5 हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

दिवाळीनिमित्त साडी खरेदीवर विविध ऑफर देण्यात आल्या होत्या. महिलेले या ऑफरमध्ये साडी खरेदी केली. 500 रुपयांचे ऑनलाइन पेमेंट देखील केले. शनिवारी सकाळी साडी महिलेला घरपोच मिळाली. मात्र मिळालेल्या साडीमध्ये आणि बुक केलेल्या साडीमध्ये बराच फरक होता. त्यामुळे या महिलेने साडी परत करून, पैसे परत मिळावे यासाठी कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला. दरम्यान संशयित आरोपीने महिलेचा फोन हॅक करून स्वत: महिलेशी संवाद साधला.

एटीएम कार्डची माहिती घेतली

‘कंपनीच्या पत्त्यावर साडी परत पाठवून द्या, व पैसे पुन्हा खात्यात जमा करण्यासाठी आम्ही सांगतो ती माहिती द्या’ असं या आरोपीने महिलेला सांगितले. त्यानुसार महिलेचा बँक खाते नंबर, एटीएम कार्डची माहिती विचारली. मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी महिलेने सांगितला. यांनतर काही मिनिटांतच महिलेच्या खात्यातून पाच हजार रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळवण्यात आले. या प्रकरणी महिलेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा -कोरोना दबा धरुन आहेच, देवदर्शन घेताना काळजी घ्या - संजय राऊत

हेही वाचा -सिरीयल किलर रामन राघव याला अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

Last Updated : Nov 15, 2020, 7:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details