जळगाव -वाहन चालकांना पक्का परवाना देण्यासाठी शिबिरात खोटा उमेदवार उभा करण्यात आला होता. तसेच फॉर्मवर दुसर्या व्यक्तीचा फोटो चिकटवून शासनाची फसवणुक करणाचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध भुसावळ शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उप-प्रादेशिक परिवहन विभागातील मोार वाहन निरीक्षक घनश्याम दिलीप चव्हाण (रा. गणेश कॉलनी) हे ५ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबरपर्यंत शिबिर दौर्यावर होते. २६ रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला मोकळ्या जागेत मोटार वाहन निरीक्षक संदिप शांताराम पाटील यांच्यासह ते वाहनांचे पक्क्या परवान्यासाठी अर्जदाराची चाचणी घेत होते. यावेळी राजेश सिंधी उर्फ सुक्का हा त्याठिकाणी आला आणि त्याच्याकडील उमेदवारांचे अर्ज त्याने अधिकार्यांकडे दिले. या अर्जातील चेतन पांडुरंग पाटील यांच्या अर्जासह कागदपत्रांनी पाहणी केली असता त्याच्या फॉर्मवर संगणीकृत असलेला फोटो नसून त्याठिकाणी दुसरा फोटो चिकटविलेला आढळून आला.
बनावट उमेदवाराने केली स्वाक्षरी -
उमेदवार बनावट असल्याची कुणकुण लागताच अधिकार्यांनी राजेश सिंधी याच्यासोबत असलेल्या व्यक्तीला ओळखपत्र दाखविण्याबाबबत विचारणा केली. मात्र, काहीच न बोलल्याने पाकिट घरी राहिले आहे, असे त्या बनावट उमेदवाराने सांगितले. त्यानंतर फॉर्मवर असलेली सही व बनावट उमेदवाराने केलेली सही यांची तुलना केली असता दोघांमध्ये फरक दिसून आला.
हेही वाचा -महाविकास आघाडीला घवघवीत यश; जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जल्लोष