जळगाव - जिल्हा प्रशासनाला गुरुवारी रात्री उशिरा तिसऱ्या टप्प्यात प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये पुन्हा 14 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आता 571 इतकी झाली आहे. गुरुवारी दिवसभरात 48 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
जळगाव जिल्ह्यात आढळले आणखी 14 कोरोनाबाधित रुग्ण
गुरुवारी रात्री पुन्हा 14 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 571 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 233 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 68 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पाचोरा, रावेर, सावदा, भुसावळ आणि जळगाव येथील 106 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल जिल्हा प्रशासनाला रात्री उशिरा तिसऱ्या टप्प्यात प्राप्त झाले. यापैकी 92 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 14 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये पाचोऱ्याचे तीन, निभोंरा सीम येथील तीन, रावेर येथील एक, भोकर येथील तीन, भुसावळ येथील एक, जळगाव शहरातील डहाके नगर, कोळीवाडा तसेच पोलीस लाईन येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
233 रुग्णांची कोरोनावर मात -