जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. सोमवारी रात्री जळगाव जिल्ह्यात पुन्हा 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी जळगावात एक आणि भुसावळमध्ये ३ रुग्णांची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 180 वर पोहचली आहे.
जिल्हा प्रशासनाला सोमवारी 2 टप्प्यात प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 8 रुग्ण आढळले आहेत. सोमवारी रात्री उशिरा दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या 12 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी 8 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह तर, 4 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये एक व्यक्ती जळगावची तर तीन व्यक्ती भुसावळच्या आहेत. यामध्ये जळगाव येथील 50 वर्षीय पुरुष, तर भुसावळ येथील तलाठी कॉलनीतील 10 वर्षीय मुलगा, जाम मोहल्ला येथील 48 वर्षीय पुरुष व अयाश कॉलनी येथील 60 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.