महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑनलाईन पैसे चोरी प्रकरणात आणखी चौघांना अटक - जळगाव ऑनलाईन पैसे चोरी प्रकरण

कोट्यवधी रुपयांवर ऑनलाईन पद्धतीने डल्ला मारण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा जळगाव पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पर्दाफाश करत दोघांना अटक केली होती. त्यानंतर नाशिक व गुजरात येथून या चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

four-more-arrested-in-online-money-theft-case-in-jalgaon
ऑनलाईन पैसे चोरी प्रकरणात अजून चौघांना अटक

By

Published : Oct 18, 2020, 2:16 PM IST

जळगाव- बँक खातेदारांच्या बँकिंग डिटेल्सची चोरी करून कोट्यवधी रुपयांवर ऑनलाईन पद्धतीने डल्ला मारण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा जळगाव पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पर्दाफाश केला होता. या गुन्ह्यात सुरुवातीला दोघांना अटक झाली होती. नाशिक व गुजरात येथून या चौघा संशयितांच्या ताब्यात घेण्यात आले. यामध्ये युनियन बँकेच्या एका बडतर्फ मॅनेजरचा समावेश आहे. रवींद्र मनोहर भडांगे (४९) रा. जेलरोड नाशिक, भारत अशोक खेडकर (४७) रा. जेलरोड नाशिक, दीपक चंद्रसिंग राजपूत (४६) रा. पंचवटी, नाशिक आणि जयेश मणिलाल पटेल (४३) रा. चिखली, गुजरात असे अटकेतील संशयितांची नावे आहेत.

देशभरातील बड्या आसामींचे कोट्यवधींच्या रकमा असलेल्या बँक खात्यांची माहिती चोरी करून ४१२ कोटींवर ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्लॅन असलेल्या टोळीचा हॅकर मनीष भंगाळे याच्या मदतीने रामानंदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. या गुन्ह्यात जळगावातील पत्रकार हेमंत पाटील (42) रा. शिवाजी नगर जळगाव, मोहसीन खान (35) देवपुर धुळे, याला पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणात अद्यापपर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील संशयित रवींद्र भडांगे हा कल्याण येथे असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एलसीबीचे पथक कल्याणला रवाना झाले होते. त्यानंतर हॅकर मनीष भंगाळे याने त्याच्याशी मोबाइलवर संपर्क साधून चर्चा करायची आहे, असे सांगून भिवंडी येथे बायपासजवळ बाेलावले. शेवटी तो भिवंडी येथे आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. भडांगे हा नाशिक येथे युनियन बँकेत व्यवस्थापक म्हणून नोकरी करीत होता. बँक डिटेल्सच्या हेरफार प्रकरणात त्याच्यावर दोन वर्षांपूर्वी बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच जयेश पटेल याला गुजरात राज्यातील चिखली येथून अटक करण्यात आली. तो मासे विक्री करतो. पोलिसांनी सर्व संशयितांचे मोबाइल जप्त केले आहेत. त्यांनी माहिती कोठून मिळवली याचा शाेध सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details