महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रस्त्यावर लूटमार करणारे चौघे अटकेत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

लुटमार करणारे चौघे हे जळगावातील तांबापुरा भागातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तांबापुरातून पोलिसांनी अश्विन यशवंत सोनवणे (२०, रा. मंगलपुरी, रामेश्वर कॉलनी), विजय सुनील पारधे (२०), नितीन अनिल नन्नवरे (२०, दोन्ही रा. तांबापुरा) या संशयितांना अटक केली. तर त्यांच्यासोबत एका अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

jalgaon
रस्त्यावर लूटमार करणारे चौघे अटकेत

By

Published : Jul 10, 2020, 10:45 PM IST

जळगाव- टोमॅटोने भरलेली मालवाहतूक चारचाकी गाडीला रस्त्यात अडवल्यानंतर चार जणांनी चाकूचा धाक दाखवून चालक व क्लिनरला लुटले होते. ही घटना गुरुवारी मध्यरात्री शिरसोली रस्त्यावर घडली होती. याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल असून, शुक्रवारी पोलिसांनी तपासचक्रे फिरवत लुटमार करणाऱ्या तीन तरुणांना अटक केली. त्यांच्यासोबत एका अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील रहिवासी ज्ञानेश्वर बिसन शिसे यांच्या मालकीच्या मालवाहतूक चारचाकी वाहनावर (एमएच २० डीई ३३४९) विकास सुरेश गायके (वय २१, रा. कन्नड, जि. औरंगाबाद) हा चालक म्हणून कामाला आहे. ९ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गावातील शेतकऱ्यांचे टमाटे घेवून जळगाव येथे विक्री करण्यासाठी विकास हा कन्नड येथून निघाला होता. त्याच्यासोबत अजय नावाचा क्लिनर होता. रात्री १२.३० वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील कृष्णा लॉन्स मंगल कार्यालयाजवळ अज्ञात चार तरूणांनी रस्त्यात दुचाकी आडवी लावून विकास यांची चारचाकी थांबविली. त्यातील एकाने चारचाकी चालक विकास आणि क्लिनर अजय यांना मारहाण करून दोघांकडून रोकड लुटली होती.

या घटनेनंतर विकासने डी-मार्टजवळ रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पण चोरटे दुचाकी तेथेच सोडून पळून गेले होते.

लुटमार करणारे चौघे हे जळगावातील तांबापुरा भागातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तांबापुरातून पोलिसांनी अश्विन यशवंत सोनवणे (२०, रा. मंगलपुरी, रामेश्वर कॉलनी), विजय सुनील पारधे (२०), नितीन अनिल नन्नवरे (२०, दोन्ही रा. तांबापुरा) या संशयितांना अटक केली. तर त्यांच्यासोबत एका अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details