जळगाव- कोरोनाचा संसर्ग जळगाव जिल्ह्यात वेगाने वाढत आहे. बुधवारी जिल्ह्यात 170 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2757 इतकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बुधवारी एकाच दिवशी तब्बल पावणे दोनशे रुग्ण समोर आले. आतापर्यंत एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जिल्हा प्रशासनाला बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये सर्वाधिक 42 रुग्ण हे जळगाव शहर महापालिकेच्या हद्दीतील आहेत. त्या खालोखाल 22 रुग्ण पारोळा येथे तर 19 रुग्ण रावेर शहरात आढळले आहेत. त्याचप्रमाणे, जळगाव ग्रामीण 10, भुसावळ 11, अमळनेर 7, चोपडा 6, पाचोरा 10, भडगाव 2, धरणगाव 5, यावल 8, एरंडोल 2, जामनेर 10, चाळीसगाव 5, मुक्ताईनगर 8, बोदवड 2 आणि इतर जिल्ह्यातील 1 असे एकूण 170 रुग्ण आढळून आले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील 90 रुग्ण दुसऱ्या जिल्ह्यात आहेत. त्यामुळे हे 90 रुग्ण विचारात घेतले तर जळगाव जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 2757 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी 10 तालुक्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन आकडी आहे. तर 5 तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या दोन आकडी आहे. चिंतेची बाब म्हणजे, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ही तीन हजारांच्या उंबरठ्यावर आहे.
जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर 61 टक्क्यांवर
जिल्ह्यातील 1 हजार 576 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढत असले तरी कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 61 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय व डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेजसह शहरातील गणपती हॉस्पिटल व गोल्ड सिटी हॉस्पिटल, भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटल हे सर्व सुविधांसह कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिग्रहीत केले आहेत. शिवाय नॉनकोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील 33 हॉस्पिटल्सचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत केला आहे. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी 78 कोविड केअर सेंटर, 36 कोविड हेल्थ सेंटर तर 24 कोविड हेल्थ हॉस्पिटल तयार करण्यात आली आहे. याठिकाणी बाधित रुग्णांवर उपचार होत आहेत.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची तालुकानिहाय माहिती अशी
जळगाव शहर- 280, जळगाव ग्रामीण- 33, भुसावळ- 234, अमळनेर- 196, चोपडा-131, पाचोरा-40, भडगाव- 82, धरणगाव- 65, यावल -73, एरंडोल- 44, जामनेर-78, रावेर-120, पारोळा- 88, चाळीसगाव- 17, मुक्ताईनगर -13, बोदवड -11, इतर जिल्ह्यातील- 3, जळगाव जिल्ह्यातील इतर जिल्ह्यांमधील रुग्ण - 68 याप्रमाणे एकूण 1576 रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना अपडेट
जळगाव शहर 545
जळगाव ग्रामीण 89
भुसावळ 379
अमळनेर 275
चोपडा 204
पाचोरा 65
भडगाव 115
धरणगाव 120
यावल 129
एरंडोल 94
जामनेर 136
रावेर 206
पारोळा 206
चाळीसगाव 31
मुक्ताईनगर 25
बोदवड 38
इतर जिल्ह्यातील 10
एकूण रुग्णसंख्या 2757