जळगाव- गुरुवारी पुन्हा जळगाव जिल्ह्यात 168 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 3798 इतकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या देखील सातत्याने वाढतच आहे. गुरुवारी 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. गेल्या तीन दिवसात कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाला गुरुवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 15 तालुक्यांमध्ये एकूण 168 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात जळगाव शहर 22, जळगाव ग्रामीण 8, अमळनेर 16, भुसावळ 3, भडगाव 1, बोदवड 9, चाळीसगाव 5, चोपडा 9, धरणगाव 10, एरंडोल 19, जामनेर 4, मुक्ताईनगर 8, पाचोरा 5, पारोळा 2 आणि रावेर येथील 16 रुग्णांचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत 1282 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील दीडशे रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत 2270 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारी 139 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. दरम्यान, कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबत नसल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी कायम आहे. गुरुवारी जिल्ह्यातील 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये चोपडा येथील 45 वर्षीय पुरुष आणि 75 वर्षीय वृद्ध, अमळनेर येथील 67 वर्षीय वृद्ध, पाचोरा येथील 65 वर्षीय वृद्ध, भुसावळ येथील 48 वर्षीय पुरुष, चाळीसगाव येथील 60 वर्षीय वृद्ध तसेच जामनेर येथील 67 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.
कोरोना अपडेट
जळगाव शहर 796
जळगाव ग्रामीण 133
अमळनेर 342
भुसावळ 435
भडगाव 234
बोदवड 88
चाळीसगाव 50
चोपडा 263
धरणगाव 177
एरंडोल 177
जामनेर 206
मुक्ताईनगर 48
पाचोरा 97
पारोळा 230
रावेर 284
एकूण 3798