महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील यांना मातृशोक - Jalgaon Latest News

माजी राज्यमंत्री आमदार डॉ. सतिश पाटील यांच्या मातोश्री मणकर्णिकाबाई भास्करराव पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी महिला सबलीकरणासाठी ग्रामीण भागात काम केले आहे.

माजी राज्यमंत्री डॉ. सतीश पाटलांना मातृशोक

By

Published : Nov 7, 2019, 2:22 PM IST

जळगाव -माजी राज्यमंत्री आमदार डॉ. सतिश पाटील यांच्या मातोश्री मणकर्णिकाबाई भास्करराव पाटील (वय 90) यांचे गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी 4 वाजता पारोळा शहरातील किसान महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्या दिवंगत माजी आमदार भास्करराव राजाराम पाटील यांच्या पत्नी होत्या.

राजकारणात सक्रिय नसताना महिला सबलीकरणासाठी ग्रामीण भागात केलेल्या कामामुळे त्यांची स्वतःची वेगळी ओळख होती. सासरी राजकारणाचा परंपरागत वारसा असताना त्या राजकारणात कधीही सक्रिय झाल्या नव्हत्या. मात्र, महिला सबलीकरणासाठी त्या आवर्जून वेळ देत असत.

ABOUT THE AUTHOR

...view details