जळगाव - राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज (सोमवारी) सकाळी साडेनऊ वाजता आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी मतदान केले.
हेही वाचा -बारामतीत अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात यावेळी भाजपने एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसेंना रिंगणात उतरवले आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांचे आव्हान आहे. या निवडणुकीच्या निकालावर एकनाथ खडसेंचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे या लढतीकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. मतदानावेळी खडसेंसोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या अॅड. रोहिणी खडसे, जावई प्रांजल खेवलकर आणि सून खासदार रक्षा खडसे उपस्थित होते.
हेही वाचा -जळगावात मतदानाला सुरुवात; पावसामुळे मतदारांची मतदान केंद्रांकडे पाठ
दरम्यान, आज आपण मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करताना मला खूप आनंद होत आहे. राज्यात पुन्हा एकदा युतीला कौल मिळेल. मतदारांचा उत्साह पाहता सत्ताधारी पक्षाला जनतेचे समर्थन असल्याचे जाणवत आहे. जास्तीत जास्त जागा आमच्या निवडून येणार आहेत. यावेळी युतीला 200 हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
माजीमंत्री एकनाथ खडसेंनी सहकुटूंब बजावला मतदानाचा हक्क हेही वाचा -सिंधुदुर्गात मतदानाला सुरुवात; सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.
हेही वाचा -विधानसभा निवडणूक : नागपुरात मतदानाला सुरुवात, मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क
या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीसदल सज्ज आहे.