महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपचे माजी जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन - भाजपचे माजी जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन

भाजपचे माजी जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे आज (गुरुवारी) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अमळनेर येथे राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

uday wagh
भाजपचे माजी जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन

By

Published : Nov 28, 2019, 11:55 AM IST

जळगाव- भाजपचे माजी जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे आज (गुरुवारी) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अमळनेर येथे राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उदय वाघ हे विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांचे पती होते.

हेही वाचा -आज उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

उदय वाघ यांनी भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून सलग दोन वेळा कार्यभार सांभाळला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षांतर्गत वादविवाद उफाळून आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा भाजपचे भडगाव येथील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. संजीव पाटील यांना देण्यात आली आहे. अमळनेर तालुक्यातील डांगरी गावाचे मूळचे रहिवासी असलेले उदय वाघ हे विद्यार्थीदशेपासून विद्यार्थी परिषदेचे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून चळवळीतील कार्यकर्ता म्हणून ते परिचित होते.

भाजपमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सक्रिय झाल्यानंतर त्यांनी पक्षसंघटन बळकटीसाठी आपले योगदान दिले आहे. सुरुवातीच्या काळात ते भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे समर्थक होते. मात्र, नंतरच्या काळात ते गिरीश महाजन गटात सक्रिय झाले होते. सध्या ते अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते.

उदय वाघ हे विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांचे पती होते. लोकसभा निवडणुकीनंतर ते जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. त्यांच्या आकस्मिक निधनाने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details