महाराष्ट्र

maharashtra

जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या भाजपकडून मुलाखती

By

Published : Sep 1, 2019, 11:40 PM IST

मुलाखत प्रक्रियेसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीत एकनाथ खडसेंनी मुलाखतीच्या कार्यक्रमाची धुरा सांभाळली. लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाची जबाबदारी सांभाळणारे गिरीश महाजन हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित इच्छुकांच्या मुलाखत प्रक्रियेसाठी अनुपस्थित राहिल्याने वेगळीच चर्चा रंगली आहे.

यावेळी उपस्थित माजीमंत्री एकनाथ खडसे, जिल्हा प्रभारी निरीक्षक मदन येरावार, खासदार उन्मेश पाटील आदी.

जळगाव - जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या रविवारी भाजपकडून मुलाखती घेण्यात आल्या. जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या बालाणी लॉन्समध्ये मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला.

जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या रविवारी भाजपकडून मुलाखती घेण्यात आल्या
ऊर्जा राज्यमंत्री तथा भाजपचे जळगाव जिल्हा प्रभारी निरीक्षक मदन येरावार, माजीमंत्री एकनाथ खडसे, संघटनमंत्री किशोर काळकर यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातून इच्छुक मोठ्या संख्येने मुलाखत देण्यासाठी आलेले होते. प्रत्येक मतदारसंघातून गेल्या वेळेच्या तुलनेत मुलाखत देणाऱ्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे आगामी काळात तिकीट वाटप करताना भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. इच्छुकांची संख्या लक्षात घेता भाजपला बंडखोरीचाही सामना करावा लागणार असल्याचे संकेत यानिमित्ताने मिळाले आहेत.

हेही वाचा - वेध विधानसभेचे : जळगाव शहर मतदारसंघ; युतीच्या तहात जागा भाजपला की सेनेला...मतदारांमध्ये उत्सुकता

गिरीश महाजन अनुपस्थित

दरम्यान, मुलाखत प्रक्रियेसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीत एकनाथ खडसेंनी मुलाखतीच्या कार्यक्रमाची धुरा सांभाळली. लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाची जबाबदारी सांभाळणारे गिरीश महाजन हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित इच्छुकांच्या मुलाखत प्रक्रियेसाठी अनुपस्थित राहिल्याने वेगळीच चर्चा रंगली आहे. जिल्ह्याच्या नेतृत्त्वाची धुरा पुन्हा खडसेंच्या खांद्यावर आली की काय? अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी गेल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.

हेही वाचा - तुझ्यात जीव रंगला.! जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापकाचे प्रेम प्रकरण चव्हाट्यावर

ABOUT THE AUTHOR

...view details