जळगाव : चाळीसगाव तालुक्यात 30 ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे तितूर नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. या पुराच्या पाण्याचा फटका अॅक्सिस बँकेलाही बसला आहे. बँकेच्या तळमजल्यावर पाणी साचल्याने हजारो रुपयांची रोकड भिजली आहे. तसेच बँकेतील लॉकरमध्येही गाळ साचला आहे. त्यामुळे ग्राहकांचे दागिने व इतर मौल्यवान वस्तूंचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
10 आणि 20 रुपयांच्या नोटा भिजल्या -
चाळीसगाव शहरात घाटरोड परिसरातील दयानंद कॉर्नरजवळ अॅक्सिस बँकेची शाखा आहे. या शाखेत पुराचे पाणी साचले. त्यामुळे नुकसान झाले आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ला माहिती देताना बँकेचे क्लस्टर हेड रवींद्र खोत यांनी सांगितले, की 'बँकेच्या तळमजल्यावर पुराचे पाणी साचले होते. त्यामुळे 10 व 20 रुपयांच्या नोटा असलेली सुमारे 4 ते 5 हजार रुपयांची रोकड भिजली. तसेच लॉकरमध्येही पाणी तसेच गाळ साचल्याने ग्राहकांचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू भिजल्या आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर लगेचच लॉकरची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भिजलेली रोकड तातडीने वेगळी करून ती सुकवली गेली'.
विद्युत यंत्रणेचेही नुकसान -