महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नगर जिल्ह्यातील चौघांच्या हत्येप्रकरणी जळगावातून पाच संशयित आरोपी ताब्यात - नगर हत्या प्रकरण जळगाव

या प्रकरणातील संशयित आरोपींनी आपण नगरला स्वस्तात सोने घेण्यासाठी गेलो होतो परंतु, कोणाचीही हत्या केलेली नाही, असे सांगत गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असताना अहमदनगर पोलिसांना या प्रकरणाचे कनेक्शन जळगावशी असल्याचे निष्पन्न झाले होते.

जळगाव
जळगाव

By

Published : Aug 23, 2020, 10:03 AM IST

जळगाव - नगर जिल्ह्यातील विसापूर फाटा येथे घडलेल्या चार जणांच्या निर्घृण हत्याकांडप्रकरणी जळगावातील पाच जणांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. नरेश ऊर्फ बाळा जगदीश सोनवणे (वय 22), प्रेमराज रमेश पाटील (वय 22), योगेश मोहन ठाकूर (वय 22), कल्पना किशोर सपकाळे (वय 40) व आशाबाई जगदीश सोनवणे (वय 42) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण जळगाव शहरातील हरी विठ्ठलनगरातील रहिवासी आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील विसापूर फाटा या ठिकाणी गुरुवारी सायंकाळी नातीक कुंजीलाल चव्हाण, श्रीधर कुंजीलाल चव्हाण, नागेश कुंजीलाल चव्हाण आणि लिंब्या हाबऱ्या काळे या चार जणांची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या झाली होती याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या घटनेचा तपास सुरू असताना अहमदनगर पोलिसांना घटनास्थळावर एक एटीएम कार्ड आढळून आले होते, ते जळगाव शहरातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले . त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत जळगावात चौकशी केली. सुरेश नावाच्या व्यक्तीने स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून जळगाव येथून पाच जणांना नगर जिल्ह्यात बोलावले होते. त्यात दोन महिलाही होत्या. ठरल्याप्रमाणे वेळेवर व ठिकाणावर सर्वजण विसापूर फाट्यावर जमले असता, जळगावच्या लोकांजवळ असलेली पैशांची बॅग हिसकावून दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर जळगावातील एकाने चौघांवर चाकू हल्ला केला. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला केला. त्यात नातीक, श्रीधर, नागेश आणि लिंब्या हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जळगावातील पाचही संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता.

संशयितांकडून गुन्ह्याची कबुली नाही

या प्रकरणातील संशयित आरोपींनी आपण नगरला स्वस्तात सोने घेण्यासाठी गेलो होतो. परंतु, कोणाचीही हत्या केलेली नाही, असे सांगत गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असताना अहमदनगर पोलिसांना या प्रकरणाचे कनेक्शन जळगावशी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ, पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर जळगाव आणि अहमदनगर पोलिसांनी दोघांच्या समन्वयातून संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा -लाचखोर प्रांताधिकारी दीपमाला चौरेंसह लिपिक सानपला अटी-शर्तींवर जामीन

ABOUT THE AUTHOR

...view details