महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात अवघ्या पाच दिवसाच्या कोरोनाबाधित बाळाचा मृत्यू! - child dies in Jalgaon

महिलेच्या प्रसूतीनंतर तिच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली होती. या कोरोनाबाधित बाळाचा अवघ्या पाच दिवसातच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली.

जळगाव वैद्यकीय महाविद्यालय
जळगाव वैद्यकीय महाविद्यालय

By

Published : Apr 16, 2021, 8:43 PM IST

जळगाव - कोरोनाबाधित महिलेच्या प्रसूतीनंतर तिच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली होती. या कोरोनाबाधित बाळाचा अवघ्या पाच दिवसातच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवारी) जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली.

जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या किनगाव येथील एका गर्भवती महिलेने शनिवारी (दि. १०) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. मातेच्या पोटात पाणी झाल्यामुळे साडेसात महिन्यातच सिझेरियन पद्धतीने तिची प्रसूती करावी लागली. बाळ कमी दिवसाचे (३० आठवड्याचे) असल्याने जन्मानंतर पहिल्या दिवसापासूनच या बाळाची प्रकृती गंभीर होती. त्याचे वजन देखील कमी होते. बाळाला पहिल्या दिवसापासूनच श्वास घ्याला त्रास होत होता. त्यामुळे बाळालादेखील ऑक्सिजन सुरू होते. आधीच कमी दिवसाचे हे बाळ असल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. शुक्रवारी पाचव्या दिवशी बाळावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

बाळाच्या आईची प्रकृती स्थिर

जिल्ह्यात कोरोनामुळे एवढ्या लहान बालकाचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. या बाळाची माताही कोरोनाबाधित असून तिच्यावर उपचार सुरू आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details