जळगाव -पारोळा शहरातील प्रमुख बाजारपेठेत 3 दुकाने बुधवारी सकाळी भीषण आगीत खाक झाली. शॉर्टसर्किटने ज्वेलर्सच्या दुकानाला लागलेली आग क्षणातच भडकल्याने आगीने शेजारी असलेल्या किराणा व कपड्यांच्या दुकानालाही कवेत घेतले. या दुर्घटनेत तीनही दुकानांचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पारोळा शहरातील प्रमुख बाजारपेठेत गाव होळी चौकात सुनील भालेराव यांच्या मालकीचे शिरसमणीकर ज्वेलर्स नावाचे सराफाचे दुकान आहे. या दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागली. त्यानंतर आग भडकल्याने या दुकानशेजारी असलेल्या सारस्वत किराणा व सुनील ड्रेसेस या दुकानांना देखील आग लागली. आग लवकर आटोक्यात न आल्याने तीनही दुकाने जळून खाक झाली. या घटनेत राधिका ज्वेलर्स या दुकानाचेही नुकसान झाले आहे.
स्वप्नांची क्षणात राखरांगोळी -