जळगाव- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. यापूर्वी इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडल्या होत्या. त्यानंतर आजपासून (२७ जानेवारी) राज्यभरातील इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा गजबजणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील १९२६ शाळांची घंटा आज खणाणली. शाळा सुरू करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार शाळांनी उपाययोजना केल्याचे पाहायला मिळाले.
जळगाव जिल्ह्यातील १९२६ शाळांची खणाणली घंटा; पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू - शाळांची खणाणली घंटा
राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून (२७ जानेवारी) सुरू झाल्या. राज्यात कोरोनाचे संकट कमी होत असतानाच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या शैक्षणिक वर्षापासून शाळा बंद होत्या.
![जळगाव जिल्ह्यातील १९२६ शाळांची खणाणली घंटा; पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू शाळांची खणाणली घंटा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10395248-540-10395248-1611726461331.jpg)
राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून (२७ जानेवारी) सुरू झाल्या. राज्यात कोरोनाचे संकट कमी होत असतानाच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या शैक्षणिक वर्षापासून शाळा बंद होत्या.
२३ नोव्हेंबरपासून उघडल्या होत्या इयत्ता ९ ते १२ पर्यंतच्या शाळा-
दरम्यान, २३ नोव्हेंबर २०२० पासून इयत्ता ९ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यावेळी पालकांची परवानगी, शिक्षकांची कोरोना टेस्ट करणे, शाळांचे निर्जंतुकीकरण करणे आदी उपयायोजना करण्यात आल्या होत्या. आजपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. कोरोना संबंधित सगळ्या प्रकारची खबरदारी घेऊन शाळा उघडल्या गेल्या. पूर्वी केलेल्या उपाययोजना आताही करण्यात आल्या.