महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 7, 2022, 5:24 PM IST

ETV Bharat / state

सहा वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करून पित्याची आत्महत्या; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

वैद्यकीय अधिकारी डॉ . शुभम तिळके यांनी दोघांना मुलगा व पित्याला मृत घोषित केले. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात ( Faijpur Police station ) घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. निलेश बखाल ( Nilesh Bakhal Suicide in Jalgaon ) यांच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त होत आहे.

निलेश घनश्याम बखाल
निलेश घनश्याम बखाल

जळगाव - फैजपूर शहरातील बसस्थानाकाच्या मागे मिरची ग्राऊंड येथे सहा वर्षीय मुलाचा गळा दाबून पित्याने खून ( father suicide after kids murder in Jalgaon ) केला. खुनानंतर पित्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज ( 7 डिसेंबर ) दुपारी समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .

निलेश घनश्याम बखाल ( वय -35, रा. विवरे ता. रावेर ) हे आपल्या पत्नी व सहा वर्षाचा मुलगा आर्यन सोबत वास्तव्याला आहेत. फैजपूर शहरातील बापू डेअरीचे संचालक आहेत. शुक्रवारी ७ जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारासा त्यांनी पत्नीला बाजार व किराणा आणण्यासाठी बाजारात सोडले. त्यानंतर ते घरी गेले. दरम्यान सकाळी 11.30 ते ते 12 वाजण्यच्या सुमाराला त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला. निलेश बखाल यांनी त्यांचा सहा वर्षाचा मुलगा आर्यन याचा गळा दाबून ( father killed child in Faijpur ) खून केला. त्यानंतर स्वतः दोरी गळफास घेवून ( father killed child in Jalgaon district ) आत्महत्या केली.

हेही वाचा-Sakinaka Crime : दुसऱ्यासोबत शारीरिक संबंधाचा संशय; प्रियकराकडून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा खून

घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट

निलेश बखाल यांची पत्नी घरी आल्यावर घराचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. दरवाजा ठोठावून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजारील लोकांच्या मदतीने दरवाजा उघडला. तेव्हा दोघांचे मृतदेह आढळून आल्याने बखाल यांच्या पत्नीला जबर धक्का बसला आहे . या घटनेमुळे फैजपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे . तातडीने दोघांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ . शुभम तिळके यांनी दोघांना मृत घोषित केले. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. यावेळी रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती.

हेही वाचा-Police Constable Murder : कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या; पत्नी व मुलीला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details