जळगाव- शहरात पिता-पुत्राच्या नात्याला काळीमा फासणारी घटना शहरात घडली आहे. एका बापाने आपल्या पोटच्या मुलाचाच खून केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. संतोष बन्सीलाल वर्मा असे संशयित आरोपी वडिलांचे नाव असून शनीपेठ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावात बापाने केला पोटच्या मुलाचा खून; संशयित आरोपीला अटक - Jalgaon crime news
सौरभला दारूचे व्यसन होते. तो दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता. १२ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास सौरभ दारू पिऊन घरी आला. त्यामुळे सौरभ आणि त्याच्या वडिलांमध्ये वाद सुरू झाले.
जळगावात बापाने केला पोटच्या मुलाचा खून
संशयित आरोपी पोलीस ठाण्यात हजर-
सौरभ वडिलांच्या अंगावर जोरात धावून आला असता वडिलांच्या हातातील चाकू सरळ सौरभच्या पोटात खुपसला गेला. त्यात सौरभ गंभीर जखमी झाला. तातडीने त्याल जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. त्यानंतर संशयित आरोपी सुभाष बन्सीलाल वर्मा हे स्वत:हून शनिपेठ पोलीस ठाण्यात हजर झाले. या प्रकरणी संशियत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
Last Updated : Feb 13, 2021, 4:22 PM IST