महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बापाने केली 2 चिमुकलींची हत्या, 50 फूट खोल विहिरीत दोघींना ढकलून स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न - बापाकडून मुलीची हत्या जळगाव

जळगावात बापानेच दोन मुलींची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जवखेडी शिवारातील अरविंद शिंदे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत त्याने तनुश्री आणि शिवन्या यांना ढकलून दिले. त्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याने विहिरीत उडी घेतल्यानंतर आरडाओरडा केली. हा आवाज ऐकून आजूबाजूला शेतात काम करणाऱ्या लोकांनी धाव घेत त्याचा जीव वाचवला. मात्र, त्याने आधी विहिरीत फेकलेल्या दोन्ही मुलींचा जीव लोकांना वाचवता आला नाही.

jawkhedi jalgaon  two daughter murder jalgaon  बापाकडून मुलीची हत्या जळगाव  जवखेडी हत्या प्रकरण जळगाव
बापाने केली 2 चिमुकलींची हत्या, 50 फूट खोल विहिरीत दोघींना ढकलून स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न

By

Published : Apr 23, 2020, 10:50 AM IST

जळगाव -कौटुंबीक वादातून एका निष्ठूर पित्याने आपल्या 2 मुलींची हत्या केली. पाणी असलेल्या 50 फूट खोल विहिरीत दोन्ही मुलींना ढकलून दिल्यानंतर पित्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपी असलेल्या पित्याला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

बापाने केली 2 चिमुकलींची हत्या, 50 फूट खोल विहिरीत दोघींना ढकलून स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न
संशयित आरोपी विकास सुरेश ढाकरे

तनुश्री विकास ढाकरे (वय 10) आणि शिवन्या विकास ढाकरे (वय 5), अशी हत्या झालेल्या दोन्ही मुलींची नावे आहेत, तर विकास सुरेश ढाकरे (वय 38) असे संशयित आरोपी असलेला त्यांच्या पित्याचे नाव आहे. विकास ढाकरे हा पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी असून तो रोजंदारीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला तनुश्री, पायल आणि शिवन्या, अशा 3 लहान मुली आहेत. बुधवारी सकाळच्या सुमारास तो तनुश्री आणि शिवन्या यांना सोबत घेऊन शेतशिवारात बकऱ्यांना चारा घेण्यासाठी गेला होता. जवखेडी शिवारातील अरविंद शिंदे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत त्याने तनुश्री आणि शिवन्या यांना ढकलून दिले. त्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याने विहिरीत उडी घेतल्यानंतर आरडाओरडा केली. हा आवाज ऐकून आजूबाजूला शेतात काम करणाऱ्या लोकांनी धाव घेत त्याचा जीव वाचवला. मात्र, त्याने आधी विहिरीत फेकलेल्या दोन्ही मुलींचा जीव लोकांना वाचवता आला नाही. कौटुंबीक वादातून त्याने हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन -

ग्रामस्थांनी तनुश्री आणि शिवन्या यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून संशयित आरोपी असलेल्या विकास ढाकरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने हे कृत्य का केले? याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

पिंपळगाव हरेश्वर परिसरात हळहळ -

या घटनेमुळे पिंपळगाव हरेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तनुश्री ही इयत्ता चौथीत, तर शिवन्या बालवाडीत शिकत होती. निष्ठूर पित्यानेच त्यांची हत्या केल्याने समाजमन सुन्न झाले आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी शिंदाड येथील पोलीस पाटील ऐश्वर्या पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी विकास ढाकरे याच्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details