जळगाव- उस्मानाबाद येथे येत्या जानेवारी महिन्यात 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी वसईचे फादर दिब्रिटो यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दिब्रिटो यांची झालेली निवड ही महाराष्ट्रासाठी परिवर्तनाची नांदी असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक तथा पद्मश्री ना. धों. महानोर यांनी व्यक्त केले आहे.
फादर दिब्रिटो यांची निवड म्हणजे महाराष्ट्रासाठी परिवर्तनाची नांदी- ना. धों. महानोर - 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
जानेवारी महिन्यात उस्मानाबादमध्ये होत असलेल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यावर ना. धो. महानोर यांनी त्यांचे व साहित्य महामंडळाचेही अभिनंदन केले.
![फादर दिब्रिटो यांची निवड म्हणजे महाराष्ट्रासाठी परिवर्तनाची नांदी- ना. धों. महानोर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4524930-842-4524930-1569219521394.jpg)
ना. धो. महानोर
प्रतिक्रिया देताना ना. धो. महानोर
यासंदर्भात बोलताना ना. धों. महानोर पुढे म्हणाले, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे मराठी साहित्य क्षेत्रासाठी आणि सामाजिक कार्यासाठीचे योगदान हे खूप मोठे आहे. त्यामुळे 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव आहे. त्यांची निवड ही सार्थच आहे, असे महानोर म्हणाले.
या निवडीबद्दल फादर दिब्रिटो व साहित्य महामंडळाचे देखील ना. धों. महानोर यांनी अभिनंदन केले आहे.