जळगाव-भरधाव जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार झाले. हा अपघात शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळ ११ जूनला रात्री ९ वाजता झाला. नागेश्वर पवार (वय ३५, रा. दत्त गॅरेजजवळ, पिंप्राळा) व त्यांचा मुलगा कार्तिक (वय ५) असे अपघातात ठार झालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत.
नागेश्वर पवार हे पिंप्राळ्यात पत्नी व दोन मुलांसह राहत होते. ते सुरक्षारक्षकाचे काम करीत होते. त्यांचा मोठा मुलगा सोहम हा गुजराल पेट्रोलपंपाच्या मागच्या बाजुला राहणाऱ्या त्यांच्या सासऱ्यांकडे काही दिवसांपासून राहण्यासाठी गेला होता. त्याला परत घरी घेऊन येण्यासाठी पवार हे लहान मुलगा कार्तिक याच्यासोबत दुचाकीने निघाले होते. गुजराल पेट्रोल पंपाजवळील बोगद्याजवळ वळण घेत असताना शिव कॉलनीकडून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने (एनएल ०१ एसी ८६९४) पवार यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पवार पिता-पुत्र गंभीर जखमी झाले. तर कंटेनरदेखील रस्त्याच्या कडेला धडकला.
हेही वाचा-आघाडी सरकारकडून राज्याचा बट्ट्याबोळ करण्याचा उद्योग - चंद्रकांत पाटील