महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा बँक निवडणूक : सर्वपक्षीय असंतुष्ठांनी मोट बांधत रिंगणात उतरवले शेतकरी विकास पॅनल! - शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार

काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपाच्या काही उमेदवारांनी एकत्र येऊन ८ जागा शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढाई सामान्य शेतकरी विरोधी धनदांडग्यांमध्ये राहणार असून, पूर्ण ताकदनिशी ही निवडणूक लढविली जाणार असल्याचीही माहिती शेतकरी विकास पॅनलच्या वतीने डी. जी. पाटील यांनी दिली आहे.

जिल्हा
जिल्हा

By

Published : Nov 9, 2021, 5:17 PM IST

Updated : Nov 9, 2021, 5:28 PM IST

जळगाव - जिल्हा बँक निवडणुकीत पुन्हा एक ट्विस्ट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वपक्षीय असंतुष्ठांनी मोट बांधत शेतकरी विकास पॅनल रिंगणात उतरवले असून, हे पॅनल महत्वाच्या ८ जागा लढणार आहे. भाजपाने माघार घेतल्याने महाविकास आघाडीच्या ११ जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी, उर्वरित १० जागांसाठी आता सर्वपक्षीय असंतुष्ट उमेदवारांनी एकत्रित येवून पॅनल तयार केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपाच्या काही उमेदवारांनी एकत्र येऊन ८ जागा शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढाई सामान्य शेतकरी विरोधी धनदांडग्यांमध्ये राहणार असून, पूर्ण ताकदनिशी ही निवडणूक लढविली जाणार असल्याचीही माहिती शेतकरी विकास पॅनलच्या वतीने डी. जी. पाटील यांनी दिली आहे.

सर्वपक्षीय असंतुष्ठांनी मोट बांधत रिंगणात उतरवले शेतकरी विकास पॅनल!

जिल्हा परिषदेत झाली बैठक

जिल्हा परिषद शिक्षण सभापतींच्या दालनात मंगळवारी (आज) दुपारी सर्वपक्षीय उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डी. जी. पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी जि.प.शिक्षण सभापती रवींद्र पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक विकास पवार, राजीव पाटील, विकास वाघ यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना डी.जी.पाटील यांनी सांगितले की, सर्वच पक्षांमधील प्रस्थांपितांकडून इतर पदाधिकाऱ्यांना डावलले जात आहे. जे धनदांडगे आहेत, तेच अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेत उमेदवारी करत आहेत. त्यामुळे अशा वृत्तीविरोधात आम्ही शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

असे असणार शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार

महिला राखीव - अरुणा पाटील, कल्पना पाटील

एनटी - विकास वाघ

ओबीसी - विकास पवार

इतर संस्था - रवींद्र पाटील

चोपडा मतदार संघ - डॉ. सुरेश पाटील

रावेर - राजीव पाटील

एससी एसटी - नामदेव बाविस्कर

काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसेंनी ठरवले?

महाविकास आघाडीचे पॅनल ठरल्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसचे उमेदवार ठरवले पाहिजे होते. मात्र, काँग्रेसचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी ठरवले. विनोद पाटील, शैलजादेवी निकम हे उमेदवार राष्ट्रवादीचे असताना त्यांना काँग्रेसचे उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली आणि काँग्रेसच्या उमेदवारांना डावलण्यात आले. चोपड्यात काँग्रेसचे विद्यमान संचालक डॉ. सुरेश पाटील यांना डावलून घन:श्याम अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व आमदार शिरीष चौधरी यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना संधी दिली नाही. त्यामुळे त्यांची तक्रार प्रदेशाकडे करण्यात येईल, अशीही माहिती डी. जी. पाटील यांनी दिली.

घन:श्याम अग्रवालांची 'मविआ'त एंट्री

महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये चोपड्याच्या जागेवरून चांगलाच वाद झाला होता. विद्यमान संचालकांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असताना, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी घन:श्याम अग्रवाल यांना उमेदवारी दिली. मात्र, तरीही मविआकडून सुरेश पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली होती. मंगळवारी चिन्ह वाटपात मविआच्या सहकार पॅनलला देण्यात आलेले कपबशीचे चिन्ह अग्रवाल यांना देण्यात आल्याने, डॉ. सुरेश पाटील यांनी आता शेतकरी विकास पॅनलकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा -पतीकडून पत्नीचा व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह स्टेट्स ; पोलिसात तक्रार केल्यानंतर तोंडावर फेकले अॅसिड

Last Updated : Nov 9, 2021, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details