जळगाव -जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कायम आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत असून, मृत्यूचे आकडेही भयावह आहेत. एवढी विपरीत परिस्थिती असताना जळगावकर मात्र, स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत कमालीचे बेफिकीर असल्याचे पाहायला मिळत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज पहाटेच्या वेळी होणाऱ्या भाजीपाला व फळांच्या लिलावावेळी हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोनाला खुलेआम निमंत्रण! उसळली गर्दी - corona updates news
जिल्ह्यासह परजिल्ह्यातील व्यापारी व शेतकरी शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी येत असतात. अशा परिस्थितीत एखादा कोरोनाबाधित व्यक्ती त्या ठिकाणी दाखल झालेला असेल तर एकाच वेळी शेकडो जणांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, हेच शेतकरी, व्यापारी जळगावातून कोरोनाचा प्रसार बाहेर देखील करू शकतात. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनासह महापालिकेने धडक कारवाई करण्याची गरज आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारीच नाही तर शेतकरी आणि किरकोळ ग्राहकांना देखील फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, निर्जंतुकीकरण अशा खबरदारीच्या उपाययोजनांचे गांभीर्य नसल्याने कोरोनाला खुलेआम निमंत्रण मिळत आहे. याठिकाणी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील व्यापारी व शेतकरी शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी येत असतात. अशा परिस्थितीत एखादा कोरोनाबाधित व्यक्ती त्या ठिकाणी दाखल झालेला असेल तर एकाच वेळी शेकडो जणांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, हेच शेतकरी, व्यापारी जळगावातून कोरोनाचा प्रसार बाहेर देखील करू शकतात. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनासह महापालिकेने धडक कारवाई करण्याची गरज आहे.