महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फैजपूर प्रातांधिकाऱ्याच्या गाडीला वाळू माफियांच्या डंपरने दिली धडक - उपविभागीय महसूल अधिकारी कैलास कडलग

विना क्रमांकाच्या डंपर्समधून वाळू वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने होत असल्याचे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Faizpur Pratandhikari's car hit by sand mafia dumper
फैजपूर प्रातांधिकाऱ्याच्या गाडीला वाळू माफियांच्या डंपरने दिली धडक

By

Published : Feb 25, 2021, 3:07 PM IST

जळगाव - यावल तालुक्यातील न्हावी यथे वाळू माफियांचा पाठलाग करणाऱ्या फैजपूर विभागीय प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने पळून जाण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिली. ही खळबळजनक घटना काल रात्री उशिरा घडली. यावेळी विभागिय अधिकाऱ्यांचा जीपचा चालक जखमी झाला असून शासकीय गाडीचेही नुकसान झाले आहे.

शासकीय गााडीचे मोठे नुकसान-

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री उशिरा अकरा वाजेच्या सुमारास बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय महसूल अधिकारी कैलास कडलग याना मिळाल्याने त्यांनी आपल्या शासकीय वाहनातून चालक उमेशसह या डंपरचा पाठलाग यावल-किनगांव दरम्यान केला. मात्र अंधाराचा फायदा घेत हा डंपर किनगाव भागात पळून जाण्यात यशस्वी झाला. तेथून परत येताना कडलग यांना न्हावी गावाकडे एक वाळू वाहतूक करणारा डंपर जाताना दिसला. त्यांनी या डंपरचा पाठलाग करताच डंपर सुसाट वेगाने न्हावी गावातील अडचणीच्या अरुंद गल्लीत शिरला. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात डंपर रिव्हर्स नेताना शासकीय गाडीला समोरून जोरात धडक देऊन गााडीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे वाहन चालक उमेश यांनाही झालेल्या ओढाताणीत वाळूमाफियांनी धक्काबुक्की केली असून त्यांना मार लागलेला आहे.

फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-

याप्रकरणी या डंपरला संरक्षण देणाऱ्या पांढऱ्या कारसह डंपरला ताब्यात घेण्यात आले आहे. सुसाट वेगाने डंपर चालवणाऱ्या युवकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरा फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी कारवाई करावी-

विना क्रमांकाच्या या डंपर्समधून वाळू वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने होत असल्याचे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करण्याची अपेक्षा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा-अपराध असेल त्यांना मुख्यमंत्री कधीच पाठीशी घालणार नाहीत - खा. विनायक राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details