जळगाव - कोरोनाच्या लढ्यात सामान्यापर्यंत सतत अपडेट देण्यासाठी तत्पर असलेल्या जळगावमधील ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीचे कोरोनाने निधन झाले आहे. सुर्यभान पाटील असे या प्रतिनिधीचे नाव आहे.
सुर्यभान पाटील हे एरंडोल तालुक्यातील पिंप्री सीम गावातून शहरात आल्यानंतर त्यांनी विविध माध्यमांमध्ये व्हिडिओ जर्नलिस्ट, बातमीदार अशा जबाबदारी सांभााळल्या होत्या. गेली काही दिवस रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज दुपारी त्यांची झुंज संपली. सुर्यभान यांच्या मृत्यूनंतर माध्यमांमधील अनेक प्रतिनिधी हळहळ व्यक्त करत आहेत. सूर्यभान यांच्या पश्चात पत्नी, 5 वर्षीय मुलगा, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. वयाच्या अवघ्या ३७ वर्षी मृत्यू झाल्याने सुर्यभान पाटील यांचा मृत्यू झाल्याने माध्यम प्रतिनिधींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.