जळगाव -भुसावळ येथील विद्युत इंजिन कारखान्यात (पीओएच) लवकरच रेल्वेच्या डिझेल इंजिनाचे रूपांतर हे इलेक्ट्रीक थ्रीफेज इंजिनात केले जाणार आहे. भारतीय रेल्वेत सर्वप्रथम भुसावळात हा बदल साकारणार आहे, अशी माहिती कारखाना प्रबंधक शिवराम यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) संजीव मित्तल यांना दिली. महाव्यवस्थापक मित्तल यांनी कारखान्याची वार्षिक पाहणी केली.
पीओएच कारखान्याने केलेल्या संशोधनात रेल्वेच्या इंजिनात मॉनिटर लावण्यात आले आहे. इंजिनात झालेल्या बिघाडाची माहिती या मॉनिटरवर दिसणार आहे. यामुळे तत्काळ दुरस्ती करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कारखान्याची कामगिरी कौतुकास पात्र आहे, अशी शाबासकीची थाप मध्य रेल्वेचे जीएम संजीव मित्तल यांनी वार्षिक पाहणी दरम्यान दिली. आतापर्यंत कारखान्यातून चार इंजिनांमध्ये एसी यंत्रणेसह सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असल्याचे कारखाना प्रबंधक शिवराम यांनी सांगितले. यावेळी डीआरएम विवेककुमार गुप्ता, वरिष्ठ अभियंता सुशील वावरे, कारखाना उपप्रबंधक सारिका गर्ग यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत मित्तल यांनी कारखान्यास दोन लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले.
बॅटरी कार इंजिन धावणार -