जळगाव -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ही निवडणूक अविरोध व्हावी म्हणून सर्वपक्षीय नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु,21 पैकी एक-दोन जागांबाबत एकमत होत नसल्याने सर्वपक्षीय पॅनलचे घोडे अडले आहे. सोमवारी रात्री सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेली कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात चर्चेची दुसरी फेरी पार पडली. पण ठोस निर्णय होऊ शकला नाही. आता जागा वाटपाच्या अंतिम निर्णयासाठी पुन्हा बैठक होणार असून, त्यात सर्वपक्षीय पॅनलचा तिढा सुटेल, अशी अपेक्षा आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी रात्री आठ वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजीमंत्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, भाजपकडून माजीमंत्री गिरीज महाजन, आमदार सुरेश भोळे तसेच काँग्रेसच्या वतीने आमदार शिरीष चौधरी व जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील आदींची उपस्थिती होती. निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावर सुमारे तासभर सर्वपक्षीय नेत्यांमध्ये बंदद्वार खल चालला. पण अखेर एक-दोन जागांबाबत निर्णय होऊच शकला नाही.
अध्यक्ष पदाचा ठरला फॉर्म्युला -