जळगाव: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी जळगाव जिल्हा दूध संघात (Jalgaon district milk association) गैरव्यवहार नव्हे तर तब्बल दीड कोटी रुपयांची चोरी झाली असल्याचा आरोप लगावला आहे. या विरोधात त्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. मात्र 15 तास ठिया आंदोलन करूनही पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नसल्याने जोपर्यंत पोलिसांचे कपडे उतरवणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा थेट इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे देखील आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन यासंदर्भात सखोल माहिती घेणार आहेत.
Eknath Khadse: जोपर्यंत पोलिसांचे कपडे उतरवणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही - एकनाथ खडसे - जळगाव जिल्हा दूध संघ गैरव्यवहार
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी जळगाव जिल्हा दूध संघात (Jalgaon district milk association) चोरी झाली असल्याचा आरोप लगावला असून, या विरोधात त्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा खडसेंनी दिला आहे.
एकनाथ खडसे
गुन्हेगार आणि पोलीसांचे साटे-लोटे असल्याचा खडसेंचा आरोप: पोलिसांनी याप्रकरणी रात्री 12 वाजता शहर पोलीस ठाण्यात एकनाथ खडसे यांचे निवेदन स्वीकारले. मात्र अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांच्या दालनातच पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाचा विरोध केला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा एकनाथ खडसे यांनी घेतला आहे.
Last Updated : Oct 14, 2022, 12:07 PM IST