महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Phone Tapping Case : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीमुळे रश्मी शुक्लांना क्लिन चिट, एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट - रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण

राज्यात गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ज्या दिवशी रश्मी शुक्ला यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाली त्या दिवशी त्यांना क्लीन चीट मिळणार असल्याचे स्पष्ट झालं होतं, त्यानुसार अपेक्षेप्रमाणे रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट मिळाली असल्याचा गौप्यस्फोट ( Eknath Khadse revealed about the phone tapping case ) खडसे यांनी केला आहे.

Eknath Khadse revealed
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा गौप्य स्पोट

By

Published : Oct 14, 2022, 4:40 PM IST

जळगाव - राज्यात गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ज्या दिवशी रश्मी शुक्ला यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाली त्या दिवशी त्यांना क्लीन चीट मिळणार असल्याचे स्पष्ट झालं होतं, त्यानुसार अपेक्षेप्रमाणे रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट मिळाली असल्याचा गौप्यस्फोट ( Eknath Khadse revealed about the phone tapping case ) खडसे यांनी केला आहे.

फोन टॅपिंग प्रकरणाविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे गौप्यस्फोट करताना

68 दिवस फोन टॅप करण्यात आला - माझा तब्बल 68 दिवस फोन टॅप करण्यात आला. या प्रकरणात मुंबई पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल आहे. मात्र फोन कोणत्या कारणासाठी टॅप करण्यात आलं हे कारण मला अद्यापही कळालेलं नसल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं. तसेच अंडरवर्ल्डच्या संदर्भात ज्यावेळी विधानसभेत प्रश्न मांडत होतो त्यावेळी पाकिस्तान सौदी अरेबिया, यासह इतर देशांमधून फोनवरून तुम्हाला मारून टाकू संपवून टाकू, अशा धमक्या देखील देण्यात आल्याचे खडसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली होती तसेच मला स्वतःला पोलिसांनी संरक्षण सुद्धा दिलं होतं.


शिंदे सरकारवर टीका - या प्रकरणाची आठवण करून देत खडसेंचे पोलिसांनी अचानक पोलीस संरक्षण काढून घेतलं होतं. ज्यांनी 50 खोके घेतली त्यांचे पोलीस संरक्षण कधी काढणार आहात, अशी टीकाही शिंदे सरकारवर केली. सरकारच्या विरोधात जो आंदोलन करतो त्याला त्रास दिला जातो तसेच ना उमेद केले जाते. अशीच भूमिका नेहमी सरकारची राहिली असल्यासही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले. एखाद्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी जर रात्रभर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करून झोपावे लागत असेल तर जनसामान्यांचे काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पुढील काळात जिल्हा दूध संघ प्रकरणातील अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details