महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

थोरात, जयंत पाटलांनी केलेला उल्लेख हीच माझ्या कामाची पावती- एकनाथ खडसे - eknath khadse on

राज्याच्या विधीमंडळात आज विरोधी पक्षनेतेपदी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. यावेळी अभिनंदनाचे भाषण करताना काँग्रेसचे नेते व मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेल्या एकनाथ खडसे यांच्या कामाचा उल्लेख केला. यावर हीच आपल्या चांगल्या कामाची पावती आहे, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

नेते, भाजप
एकनाथ खडसे

By

Published : Dec 1, 2019, 7:00 PM IST

जळगाव- भाजपचा आमदार म्हणून आपण सत्तेत कमी आणि विरोधी पक्षात जास्त काम केलेले आहे. विरोधी पक्षनेते आक्रमक आणि पूर्ण माहितीनिशी बोलले तर त्याला एक वजन असते. आपण विरोधी पक्षनेता म्हणून आपल्या कामाची छाप पाडली. त्यामुळेच आज बाळासाहेब थोरात व जयंत पाटील यांनी आपल्या कामाचा उल्लेख केला. हीच आपल्या चांगल्या कामाची पावती आहे, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. आज जळगावात खडसे पत्रकारांशी बोलत होते.

प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे


राज्याच्या विधीमंडळात आज विरोधी पक्षनेतेपदी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. यावेळी अभिनंदनाचे भाषण करताना काँग्रेसचे नेते व मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेल्या एकनाथ खडसे यांच्या कामाचा उल्लेख केला. याबाबत खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, त्यांनी आपल्या कामाचा उल्लेख केला. ती आपल्या कामाची पावती आहे. आपण जे काम केले, त्याच पध्दतीचे काम विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना अपेक्षित असावे. विरोधी पक्ष नेत्याचे यापेक्षाही चांगले काम देवेंद्र फडणवीस करतील, अशी अपेक्षा आहे.


विरोधी पक्षनेता हा उद्याचा सत्ता बदल करणारा नेता म्हणून त्याकडे बघितले जाते. किंबहुना आजचा विरोधी पक्षनेता उद्याचा मुख्यमंत्री म्हणून त्याकडे बघितले जाते. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल मान विरोधी पक्ष नेत्याला असतो. त्यामुळे त्यांच्याकडून जनतेच्या फार अपेक्षा असतात. त्यामुळे जनतेचे प्रश्‍न लावून धरणे तसेच कोणत्याही प्रश्‍नावर तडजोड न करता सरकारला जेरीस आणूण त्या प्रश्‍नाचा सकारात्मक निकाल लावणे हा खरा कौशल्याचा भाग असतो. मला एक चांगला विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. थोरात व पाटील यांनी आज मी विधीमंडळात नसल्याची खंत व्यक्त केली. ती खंत मलाही आहे, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details