जळगाव -राष्ट्रवादी प्रवेशासाठी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी सहकुटुंब मुंबईला विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने रवाना झाले. मुक्ताई साखर कारखान्याच्या हेलिपॅडवरून त्यांनी मुंबईच्या दिशेने उड्डाण केले. खडसेंसोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या अॅड. रोहिणी खडसे तसेच केअर टेकर गोपाळ चौधरी हेदेखील हेलिकॉप्टरमध्ये आहेत.
राष्ट्रवादी प्रवेशासाठी एकनाथ खडसे सहकुटुंब मुंबईला रवाना - eknath khadse news
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची निश्चितता झाल्यानंतर त्यांच्या आजच्या मुंबई दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. खडसेंसोबत कोण कोण मुंबईत जाणार याबाबत खूप उत्सुकता होती.
एकनाथ खडसे यांनी काल (बुधवारी) दुपारी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही वेळातच मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे हे शुक्रवारी दुपारी दोन वाजता मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. या साऱ्या घडामोडींनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची निश्चितता झाल्यानंतर त्यांच्या आजच्या मुंबई दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. खडसेंसोबत कोण कोण मुंबईत जाणार याबाबत खूप उत्सुकता होती. अखेर ते सहकुटुंब मुंबईला रवाना झाले. खडसे मुंबईला जात असताना त्यांना निरोप देण्यासाठी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने मुक्ताई साखर कारखान्याच्या आवारात आले होते.